’फ्लश्ड न्यूज’बद्दल थोडेसे...
गेल्या दोन वर्षांपासून पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहे. या दोन वर्षांच्या कारकिर्दीमध्ये वार्तांकन करत असताना अनेक बर्या वाईट घटना, प्रसंग आणि किस्से यांचा साक्षीदार राहीलो आहे. काही घटनांच्या बातम्या झाल्या तर काही बातम्या फ्लश झाल्या म्हणजे त्या बातम्या शिल्लक राहील्या. त्या बातम्यांमध्ये अनेक घटना, प्रसंग, घडामोडी अप्रकाशित राहील्या. त्याबाबत मनात सल होती, परंतू, माझे मार्गदर्शक, हितचिंतक, कार्यकर्ते, मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांच्या आग्रहाखातर अशा अप्रकाशित बातम्या फ्लश न करता एका वेगळ्या विचारपीठावर, ब्लॉगच्या माध्यमातून मांडत आहे. अर्थात त्यावर तुमच्या अमूल्य सुचना, सुधारणा, टिकात्मक विश्लेषण, चिकित्सा अपेक्षित आहे. त्यांचे स्वागत असेलच... मला विश्वास आहे माझ्या ह्या पहिल्या वहिल्या ब्लॉग प्रयत्नाला तुमची साथ लाभेल....
आपला कृपाभिलाषी यशपाल सोनकांबळे
No comments:
Post a Comment